Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला अटक, पिस्टल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपीकडून 25 हजार रुपयांचे पिस्टल जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटीलनगर (Patil Nagar Chikhali) येथे केली.

आदित्य कालीदास थोरात Aditya Kalidas Thorat (वय-22 रा. चिंचेचा मळा, चिखली, मुळ रा. चांडवली, ता. आंबेगाव)
असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत
गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे (वय-43) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बागळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत होते.
त्यावेळी पोलीस पथकाला पाटीलनगर येथील राममंदीरासमोर दोन जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाऊन आरोपी आदित्य थोरात याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया