Pune Pimpri Chinchwad Crime News | पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पीएमपीएमएल (PMPML Bus) वाहकाला मारहाण करुन तिकीट मशीनची तोडफोड केली. तसेच वाहकाकडील रोकड जबरदस्तीने घेऊन पळून गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरा नगर बस स्टॉप (Upper Indira Nagar Bus Stop) येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत श्याम अभिमान कांबळे (रा. टिळेकर नगर, कोंढवा) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विनायक जयसिंग बडगुजर, सचिन जयसिंग बडगुजर यांना अटक केली आहे. तर प्रमोद बडगुजर आणि निलेश बडगुजर यांच्यावर आयपीसी 392, 353, 332, 504, 427, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्याम कांबळे हे पीएमपीएमएल येथे वाहक म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते सरकारी कर्तव्य करत असताना आरोपी अप्पर इंदिरा नगर बस स्टॉप येथे बसमध्ये चढले. फिर्यादी यांनी तिकीटाबाबत विचारणा केली असता अरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला.
तसेच त्यांना पकडून हाताने मारहाण (Beating) केली.
यानंतर तिकीट काढण्याचे मशी फोडून नुकसान केले.

तसेच कांबळे यांच्या खिशातील 4 हजार 535 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन चोरी करुन पळून गेले.
याबाबत कांबळे यांनी तक्रार दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) सरकारी कामात
अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
तर इतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे (PSI Narendra Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘आम्ही इकडचे भाई आहोत’ हवेत कोयते फिरवून एकावर वार, येरवडा परिसरातील प्रकार

जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळली, एकाला अटक; कर्वेनगर परिसरातील घटना

घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली; 8 लाख 21 हजार 594 रुपयाचा दंड वसूल