Yavatmal Lok Adalat | घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली; 8 लाख 21 हजार 594 रुपयाचा दंड वसूल

घाटंजी/यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Lok Adalat | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीत (Yavatmal Lok Adalat) 604 पैकी 169 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर खावटी, चेक बाऊन्स, मोटार वाहन व इतर प्रकरणात 8 लाख 21 हजार 594 दंड म्हणून वसुल करण्यात आला. या वेळी न्यायालय क्रमांक 1 दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात (Magistrate A. A. Utpat), न्यायालय क्रमांक 2 दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर (Magistrate A. A. Kalamkar) आदीं उपस्थित होते.

लोक अदालतीत प्रकरणात (Yavatmal Lok Adalat) न्यायालयाच्या बाहेर 2270 प्रकरणापैकी 286 प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात बॅकेची कर्ज वसुली, विद्युत बिल, ग्रामपंचायत थकबाकी कर इत्यादी 19 लाख 39 हजार 498 रुपये दंड म्हणून वसुल करण्यात आले. घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात एकुण 2874 प्रकरणापैकी 455 केसेस निकाली काढण्यात आले असून 27 लाख 61 हजार 92 रुपये दंड म्हणून वसुल करण्यात आला आहे.

या वेळी घाटंजी न्यायालयातील विधिज्ञ, घाटंजी (Ghatanji Police Station) व पारवा पोलीस स्टेशनचे (Parwa Police Station) कोर्ट मोहरर, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, न्यायालयीन अधिक्षक बी. पी. बागडे, वरिष्ठ लिपिक रवि बुटले, वरिष्ठ लिपिक योगीता दरणे, राहुल बनारसे, कनिष्ठ लिपिक ऋषीकांत खडसे, पवन राठोड, विश्वास चेडे, भगत मॅडम, शिपाई लखन आडे, शिपाई मोनाली भवरे, शिपाई संतोष अकोलकर,
शिपाई देशपांडे मॅडम आदीं न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा