Pune Pimpri Chinchwad Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळली, एकाला अटक; कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदाराला धारदार हत्याराचा धाक दाखवून महिन्याला एक हजार रुपये हप्ता मागितल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास कर्वेनगर ब्रिजखाली श्रीराम फ्रुट स्टॉल व भाजीच्या दुकानाजवळ घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी उत्कर्ष आबासाहेब निलंगेकर (रा. वारजे गाव, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील भारत भूमकर (रा. खान वस्ती, बुद्ध विहारसमोर, रामनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 386, 504, 504/2 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानासमोर येऊन शर्ट मध्ये लपवलेले धारदार हत्यार बाहेर काढले. फिर्यादी यांना हत्यार दाखवून ‘तुला इथे दुकान लावायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये दे. तु जर पैसे दिले नाही तर तुला खल्लास करुन टाकतो’ अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्याकडून एक हजार रुपये घेतले.

तसेच दर महिन्याला मला एक हजार रुपये हप्ता (Extortion) द्यावा लागेल,
नाहीतर मी तुझ्या दुकानाची तोडफोड करेन.
जर तु पोलिसांकडे तक्रार केली तर तुझा मर्डर करुन टाकीन अशी धमकी दिली.
तसेच हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली; 8 लाख 21 हजार 594 रुपयाचा दंड वसूल

हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या लष्कर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

हिवाळ्यात वाढतो फ्रॅक्चरचा धोका, ‘या’ 7 सुपरफूड्सने तुमची हाडे होतील मजबूत…

तु मला खुप आवडतेस’ महिलेचा हात पकडून विनयभंग, हांडेवाडी परिसरातील प्रकार

पुण्यातील धक्कादायक घटना! लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार