Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘आम्ही इकडचे भाई आहोत’ हवेत कोयते फिरवून एकावर वार, येरवडा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत ही दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात कोयत्याने वार करुन दहशत पसरवल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील येरवडा परिसरात हवेत कोयते फिरवून ‘आम्ही इकडचे भाई आहोत, इथे कोणी थांबायचे नाही’ असे म्हणत परिसरात दहशत पसरवून एकाच्या डोक्यात वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जैद आक्रम अन्सारी (रा. यशवंत नगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून कार्तिक व फुर्त्या (रा. गाडीतळ, येरवडा) यांच्यावर आयपीसी 324, 336, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री साडे नऊच्या सुमारास नवी खडकी येरवडा येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैद अन्सारी हे त्यांच्या भावाला जेवणाचा डबा देऊन घरी परत येत होते. फिर्यादी हे नवी खडकी येथील रेम्बो बेकरी जवळ आले असता त्यांच्या ओळखीचे आरोपी कार्तिक व फुर्त्या हे हवेत कोयते फिरवत व मोठ मोठ्यांदा आरडा ओरड करत आले.
‘आम्ही इकडचे भाई आहोत, येथे कोणी थांबायचे नाही’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवली.
तसेच हातातील कोयता फिर्यादी यांच्या डक्यात मारुन गंभीर जखमी केले.
यानंतर पुन्हा हतातील कोयते हवेत फिरवून तेथून जात असताना दहशत पसरवली.
यामुळे आजूबाजूचे लोक पळून गेले.
पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळली, एकाला अटक; कर्वेनगर परिसरातील घटना

घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली; 8 लाख 21 हजार 594 रुपयाचा दंड वसूल

हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या लष्कर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA