Pune Pimpri Chinchwad Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी तळेगाव दाभाडे पोलिसांकडून गजाआड; पिस्टल, कोयता जप्त

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी (PCPC Police) अटक केली आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी (Robbery) लागणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपींमध्ये पाच अल्पवयीन (Minor) मुलांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घोरावडी रेल्वे स्टेशनच्या (Ghoravadi Railway Station) पाठिमागील मोकळ्या जागेत करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राज उर्फ बारक्या प्रमोद साठे (वय-19), शाहरुख उर्फ चिण्या दिलावत शेख (वय-19 दोघे रा. भिमाशंकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे. तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे (PSI Sandesh Ingle) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 399, 402 सह आर्म अॅक्ट (Arm Act), मुंबई पोलीस अॅक्ट (Mumbai Police Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरावडी रेल्वे स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत एका झुडपाच्या आडोशाला काहीजण
थांबले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार तपास पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून लोखंडी पिस्टल (Pistol), कोयता, लाकडी दांडके, मिरची पावडर, दोरी असे साहित्य जप्त केले आहे.
आरोपी तळेगाव मधील एखाद्या श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना बेड्या
ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Intelligence Bureau Bharti | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आयबीमध्ये मोठी भरती, लवकर करा अर्ज, प्रक्रिया सुरू

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

Post Viral On Social Media | लवकरच पुलवामा सारखा हल्ला होईल ! सोशल मीडियावर विद्यार्थ्याची पोस्ट; झारखंडमधील विद्यार्थी अटकेत, संरक्षण मंत्री काश्मीर दौर्‍यावर

NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”

Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या