Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : एकतर्फी प्रेमातून अपहरण करुन खून, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचे गुढ उकलले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिरगाव पोलीस ठाण्याच्या (Shirgaon Police Station) हद्दीत चांदखेड येथील एका पडक्या खोलीत 19 जानेवारी 2022 रोजी एका तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट (Pune Police Crime Branch) पाच च्या पथकाने तपास करुन मृत तरुणाची ओळख पटवून एका विवाहित महिलेसह इतरांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )

शिरगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच करीत होती. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) एक तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यातील बेपत्ता तरुणाचे वर्णन आणि चांदखेड येथील आढळून आलेल्या तरुणाशी जुळत होते. त्यावरुन पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली. तरुणाचे एका विवाहित महिलेशी एकतर्फी प्रेम होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

युनिट पाचच्या पोलिसांनी विवाहित महिलेला आणि तिच्या पतीला तब्यात घेऊन चौकशी केली. मात्र तिने पोलिसांची दिशाभूल केली. याच दरम्यान पोलीस अंमलदार नागेश माळी आणि दत्तात्रय खेडकर यांनी विवाहित आणि मृत तरुणाच्या फोन नंबरची तांत्रिक माहिती काढली. यावरुन ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी महिलेकडे सखोल चौकशी केली असता तिने खुनाची (Murder Case) कबुली दिली.

विवाहितेने तिच्या दाजी आणि मानलेल्या भावाच्या व त्यांच्या साथीदारांना मदतीसाठी घेऊन तरुणाच्या खूनाचा कट रचला.
देवाची उरुळी येथील तरुणाला भेटण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी परिसरात बोलावून घेतले.
त्यानंतर तरुणाला चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले.
त्यानंतर त्याला मावळ तालुक्यातील करंजविहारे गावाच्या हद्दीतील जंगलात नेले. त्याठिकाणी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. मारहाण केल्यानंतर तरुणाला पुन्हा चारचाकी वाहनात बसवून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गाडीत मारहाण केली. या मारहाणीत तरुण बेशुद्ध झाल्याने आणि त्याची हालचाल बंद झाल्याने आरोपींनी त्याला चांदखेड खिंडीमध्ये जंगलाच्या बाजूला असलेल्या पडक्या इमारतीजवळ नेले. त्याठिकाणी पुन्हा त्याला लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचा खून करुन मृतदेह खोलीत टाकून दिला.

पोलिसांनी महिलेकडे केलेल्या चौकशीत तिचा दाजी आणी साथीदारांची नावे समोर आले.
त्यानुसार सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.
या चौकशीत प्रत्येकाच्या बोलण्यात विसंगती होती. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करुन खून केला.
खून केल्यानंतर तरुणाची ओळख पटू नये यासाठी मृतदेहावरील कपडे काढून घेतले.
त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जंगलातील एका पडक्या खोलीत मृतदेह फेकून दिला.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अत्यंत कुशलतेने गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | पंतप्रधानांवर शरद पवारांची जोरदार टीका, ”मोदी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी उपवास…”

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी मराठा आरक्षणासंबंधी दिली महत्वाची माहिती, ”सरकारकडून मसूदा तयार, आता…”

न्याती कंपनीच्या ध्यान मंदिराच्या घुमटावरुन पडून कामगाराचा मृत्यू, कॉन्ट्रॅक्टरवर FIR

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ”सरकारकडून माझ्यावर डाव, मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि…”

PCMC Water Supply | पिंपरी चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद