Pune Pimpri Chinchwad Crime News | बापाला दारु पाजतोस म्हणत स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण, वाकड परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तु माझ्या बापाला दारु का पाजतोस असे म्हणत स्नॅक सेंटर चालकाला मारहाण करुन टपरीतील सामानाची तोडफोड केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. हा प्रकार गुरुवारी (दि.1) रात्री साडे आठच्या सुमारास ताथवडे येथील डी.वाय. पाटील कॉलेज जवळील स्नॅक्स सेंटरच्या टपरीवर घडली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत संतोष लिंबाजी डोंगरे (वय-38 रा. नरहरी कॉलनी, जीवननगर, ताथवडे, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) तक्रार केली आहे. यावरुन वैभव लिंबाजी डोंगरे (वय-38 रा. जीवननगर, ताथवडे, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ताथवडे येथील डी. वाय. पाटील कॉलेज जवळ स्नॅक्सची टपरी आहे. फिर्यादी टपरीवर असताना स्नॅक्स सेंटरच्या जागा मालकाचा मुलगा आरोपी त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादीला तु माझ्या वडिलांना दारु का पाजतोस म्हणत टपरीवरील सामानांची तोडफोड केली. तसेच दुचाकी ढकलून देत त्याठिकाणी पडलेला दगड गाडीवर मारुन नुकसान केले.

त्यावेळी फिर्यादी यांनी मी तुझ्या वडिलांना दारु पाजत नाही, असे म्हणाले.
त्याचा राग आल्याने आरोपीने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोक्का गुन्ह्यातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

मासे विकत घेण्यावरुन वाद, तरुणावर कोयत्याने वार; दहशत पसरवणाऱ्या तिघांना अटक, भोसरी परिसरातील प्रकार

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी

तळेगाव दाभाडे : जुन्या वादातून हातोड्याने डोक्यात वार, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

पतसंस्थेने सील केलेल्या सदनिकेवर अतिक्रमण, डॉक्टरवर FIR; कोंढवा परिसरातील प्रकार

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर एकेरी भाषेत टीका, ”तू ओबीसींचं वाटोळं केलं…”