Pune Pimpri Chinchwad Crime News | वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | उच्च न्यायालयात (High Court) वकिली (Advocate) करणार्‍या वकिलाच्या म्हाळुंगे -बाणेर रोडवरील फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. दोघीही स्वत:ला वकिलांची सहायक समजतात. एक दुसरीला वेश्या संबोधतात. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत एका ३२ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४८८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे निलख येथे राहणार्‍या एका महिलेविरुद्ध मारहाण (Beating) करणे, बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सध्या एका वकिलाच्या घरी भाड्याने रहात आहे. त्यांनी शिवाजीनगर येथे डान्स अ‍ॅकडमी (Dance Academy) सुरु केली होती. गावाकडील जमिनीच्या केसमुळे त्यांची या वकिलांशी ओळख झाली होती. २०२० मध्ये आरोपी महिला त्यांच्या अ‍ॅकॅडमीमध्ये आली. तिने अ‍ॅक्टींगचा कोर्स करायचा असल्याचे सांगून त्यांच्या अ‍ॅकॅडमीची सर्व माहिती घेतली. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी महिलेने काळेवाडी येथे डान्स अ‍ॅकॅडमी सुरु केली. ती २ महिन्यात बंद पडली. त्यानंतर या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) येऊन फिर्यादी या अवैध व्यवसाय करते, अशा खोट्या तक्रारी करुन त्यांना अ‍ॅकॅडमी बंद करायला लावली. त्यानंतर त्यांनी ही अ‍ॅकॅडमी बंद करुन फर्ग्युसन रोडवरील सोसायटीत अ‍ॅकॅडमी सुरु केली. तेव्हा तेथेही येऊन आरोपी महिलेने खोटे नाटे आरोप करुन ही अ‍ॅकॅडमी बंद करण्यास सांगितले. ही आरोपी महिला त्या वकिलांची मैत्रिण व सहायक असल्याचे फिर्यादी यांना समजले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी यांनी २०२३ पासून एलएलबीचे शिक्षण सुरु केले. त्याची प्रॅक्टीस करीता त्या या वकिलाकडे काम करत असत.
ऑगस्ट २०२३ मध्ये त्या राहण्याकरीता फ्लॅटचा शोध घेत असताना त्यांना या वकिलांचा म्हाळुंगे बाणेर रोडवरील फ्लॅट
खाली असल्याचे समजले. त्यांनी तो भाड्याने राहण्यास घेतला. हे वकिल पुण्यात असतात, तेव्हा आपल्या पक्षकारांना याच फ्लॅटवर चर्चेसाठी बोलवितात. २७ डिसेंबर रोजी सकाळी हे वकिल आपल्या पक्षकारांशी चर्चा करीत असताना ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी महिला आली. फिर्यादी यांना पाहताच त्यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना धक्का देऊन बेडरुममध्ये निघाली. फिर्यादी यांनी त्यांना अडविले. तेव्हा तिने तेथे पडलेल्या बेल्टने तिला मारहाण केली.

केस पकडून खाली पाडले. खाली पडल्यानंतरही त्यांना बेल्टने पाठीवर मारहाण करत होत्या.
त्यामुळे फिर्यादी यांना चक्कर आली. थोड्या वेळाने फिर्यादी यांना शुद्ध आली.
तेव्हा आरोपी महिला पोलिसांना फोन करुन बोलावत होती. या वकिलाने तिला घराबाहेर जाण्यास सांगितले.
त्यावेळी तिने तू वैश्या आहेस, तुझा धंदा कसा चालतो, तेच बघते असे म्हणून आता तुझी सगळीकडे बदनामी करणार आहे.
तुला सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत निघून गेली.

फिर्यादीनुसार हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संदिप देशमुख (PSI Sandeep Deshmukh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून आंबेगाव बु. येथील अनधिकृत 11 इमारतींवर हातोडा

Pune Municipal Corporation (PMC) | थकीत पाणी बिलावर मनपा आकारणार दंडात्मक व्याज, मीटर बिल भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत

हिंजवडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत राडा, सदस्यासह 8 जणांवर FIR

अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन, दोन ऍम्ब्युलन्स चालकांवर FIR; आळंदी मधील प्रकार

लिफ्ट मागणे बेतले जीवावर, भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; निघोजे येथील घटना

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक