Pune Pimpri Chinchwad Crime News | अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन, दोन ऍम्ब्युलन्स चालकांवर FIR; आळंदी मधील प्रकार

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ऍम्ब्युलन्समध्ये चालका (Ambulance Driver) शेजारील सीटवर बसलेल्या महिलेसोबत अश्लील बोलून तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार वेगवेगळ्या तारखांना घडला असून याप्रकरणी दोन चालकांवर आळंदी पोलीस ठाण्यात (PCPC Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 38 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गोरखनाथ दराडे (वय-40 पूर्ण नाव पत्ता माहित नाही), शिवप्रसाद ससाणे (वय-41 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 354, 354(अ), 509, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी फिर्यादी महिला ऍम्ब्युलन्समध्ये दराडे याच्या शेजारील डॉक्टरच्या सीटवर बसल्या होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे केले.
त्यानंतर महिलेच्या खांद्यावर हात टाकला असता त्यांनी आरोपीचा हात जोरात झटकला. त्यावेळी आरोपी दराडे याने महिलेकडे पाहून अश्लील बोलून विनयभंग केला.

तसेच आरोपी शिवप्रसाद ससाणे याने 10 डिसेंबर रोजी महिलेसोबत चालत्या गाडीत गैरवर्तन करुन स्त्री मनास
लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर गाडीच्या समोरील व्यक्तीला उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
तसेच मी सर्पमित्र असून माझी तक्रार कोणी केली तर त्याचा खेळ खल्लास करीन अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक

लिफ्ट मागणे बेतले जीवावर, भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; निघोजे येथील घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘राज्य उत्पादन शुल्क’कडून पुण्यात विदेशी मद्याचा साठा जप्त

महिलेसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा, आझाद समाज पार्टीची पीएमपीएमएल प्रशासनाकडे मागणी

Nandurbar Police News |  नंदुरबार पोलिसांकडून ‘गुन्हेमुक्त गांव’ योजनेला सुरुवात