Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार दिल्याच्या रागातून वैदुवाडी परिसरात वाहनांची तोडफोड, हडपसर पोलिसांकडून 13 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार दिल्याच्या रागातून 13 जणांच्या टोळक्याने वैदुवाडी येथे फिर्यादी यांच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड करत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास हडपसर येथील वैदुवाडी येथे घडला. हडपसर पोलिसांनी (Pune Police) गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून 13 आरोपींना काही तासात ताब्यात घेतले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अनिकेत रविंद्र पाटोळे (वय-23), आदीत्य रविंद्र पाटोळे (वय-21), लखन बाळू मोहिते (वय-19) तुषार बाळू मोहिते (वय-18), हसनील अली सेनेगो (वय-19), गौरव विजय झाटे (वय-19), पंकज विठ्ठल कांबळे (वय-21), ओंकार महादेव देडे (वय-20 सर्व रा. वैदुवाडी, रामटेकडी हडपसर) या आठ जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या 5 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. याबाबत तानाजी मारुती खिलारे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 307, 324, 427, 143, 144, 145, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा विश्वास गणेश खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवी पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखी व्यक्तीं विरोधात 16 डिसेंबर रोजी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. याचा राग मनात धरुन आरोपींनी सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हातात लोखंडी हत्यारे घेऊन फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी फिर्यादी यांना शस्त्राने व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

तसेच घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या व इतर वस्तीमधील 7 ते 8 वाहनांचे नुकसान केले. तर बेकरी आणि प्रोव्हिजन स्टोअर्सचे काउंटरच्या काचांची तोडफोड करुन नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवून ‘कोणाला ही सोडु नका, आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे (PSI Mahesh Kavale) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R. Raja)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke),
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle)
यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे
(API Vijayakumar Shinde), पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde),
पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड,
समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे,
निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे,
अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसरकर,
रामदास जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जेवण देण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकावर धारदार हत्याराने वार, दोघांना अटक; सदाशिव पेठेतील घटना