
Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘शादी डॉट कॉम’ साईटवरुन संपर्क करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन मोबाईल क्रमांक घेऊन एका तरुणीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखवत (Lure Of Marriage) लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. दरम्यान तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करुन लग्नास नकार देत शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी 2022 ते 17 जून 2023 या कालावधीत ताथवडे, तळेगाव दाभाडे आणि आरोपीच्या कारमध्ये घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News )
याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश शंकर जगदाळे Akash Shankar Jagdale (वय-32 रा. जिजामाता चौक, कडोळकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणीची मराठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन प्रोफाइल पाहून त्यावरुन आरोपीने मोबाईल क्रमांक घेतला. आरोपीने पीडीत तरुणीला संपर्क करुन तिच्यासोबत ओळख वाढवली. तिला लग्नाचे आमिष दाखवले. लॉजवर, मोटारीत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणी गर्भवती झाल्यानंतर आरोपीने ‘तू गर्भपात केला तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन, अन्यथा मी लग्न करणार नाही’ अशी धमकी दिली.
आरोपीने पीडीत तरुणीला तिच्या मनाविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडले.
यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.
तसेच शिवीगाळ करुन शारीरिक संबंध करतानचा मोबाईलमधील व्हिडीओ पीडीत तरुणीला दाखवून त्रास दिला तर
व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…