Pune Pimpri Chinchwad Crime News | ब्युटी पार्लरमध्ये महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR; हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आजारपणात केलेला खर्च व ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlor) केलेल्या मेकपचा खर्च याचा हिशोब करण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत तिच्या सोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केला. तसेच महिलेच्या मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.28) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रोडवरील एका ब्युटी पार्लरमध्ये घडला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मंहमदवाडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) शनिवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. यावरुन हांडेवाडी रोड येथे राहणाऱ्या महिलेसह तिचा भाऊ सागर व मुन्नाभाई (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 354, 341, 342, 324, 509, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे मेडिकल दुकान आहे तर आरोपी महिलेचे हांडावाडी रोड परिसरात ब्युटी पार्लर असून दोघी ऐकमेकांच्या ओळखीच्या आहेत. फिर्यादी यांनी आरोपी महिलेकडे पैसे नसल्याने तिच्या आजारपणात औषधोपचाराचा खर्च केला होता. आरोपी महिलेचे तिच्या ब्युटी पार्लर असल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणींनी आरोपी कडे मेकअप केला होता. मेकअपचा सर्व खर्च फिर्यादी यांनी केलेल्या खर्चातून कवर करुन घेण्याचे दोघींमध्ये ठरले होते. मात्र, आरोपींनी फिर्यादी यांच्या मेडीकल दुकानात जाऊन मेकअप केल्याचा खर्च मागून शिवीगाळ केली.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्य़ादी व त्यांची मैत्रिण आरोपी महिलेच्या ब्युटी पार्लरमध्ये हिशोब करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिलेचा भाऊ सागर व मुन्नाभाई त्याठिकाण आधीपासून हजर होते. हिशोबावरुन फिर्य़ादी व महिला यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपीचा भाऊ सागर याने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
तसेच हॉकी स्टीक व बेस बॉलच्या दांडक्याने बेदम मारहाण करुन जखमी केले.
तर मुन्नाभाई याने फिर्यादी यांना ब्युटी पार्लर बाहेर जाण्यास अटकाव करुन
फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला जीवे
मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नातवाकडून आजीला दगडाने मारहाण; धनकवडीमधील घटना

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक; वडगाव शेरी परिसरातील घटना

ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित