Pune Pimpri Chinchwad Crime News | नातवाकडून आजीला दगडाने मारहाण; धनकवडीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘चोऱ्या माऱ्या करु नको’ असे सांगितल्याचा राग आल्याने नातवाने आजीला दगडाने मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. तर सुनेने शिवीगाळ केली. हा प्रकार धनकवडी (Dhankawadi) येथे रविवारी (दि. 31 डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास चव्हाण नगर येथे घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अंजु सँडो पवार (वय-50 रा. तीन हत्ती चौक, चव्हाणनगर धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन नातू सनी सुनील पवार (वय-22), सुन भारती सुनील पवार (वय-38 रा. शनि मंदिराजवळ, धनकवडी) यांच्यावर आयपीसी 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी पवार हा फिर्यादी यांच्या मोठ्या दिराचा नातु आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सनी याला ‘चोऱ्या माऱ्या करु नको’ असे मोठ्या आवाजात सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तर सनी पवार याने घरासमोर पडलेला दगड उचलून फिर्यादी अंजु पवार यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
तसेच बघुन घेण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित

पुणे : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांविरुद्ध FIR

धर्मांतरण, काळ्या जादुच्या आरोपावरुन वादग्रस्त धर्मगुरुला अटक; नववर्षाच्या पहाटे कारवाई

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, दागिने अन् पैसे लुबाडले; पुण्यातील नऱ्हे येथील प्रकार

चालत्या रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्‍लील चाळे, आरोपी तरुणावर FIR; हडपसर परिसरातील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना

थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती

पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे, शासन आदेश जारी

”सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातला नेणे ही महाराष्ट्राशी गद्दारी”; शिवसेना आमदाराचा राणे-सामंतांवर आरोप

मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 77 वी स्थानबध्दतेची कारवाई

बसमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या परराज्यातील चोरट्याला सहकानगर पोलिसांकडून अटक

पुणेकरांना मिळाली वैविध्यपूर्ण नाटकांची पर्वणी; काँग्रेस आणि हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित नाट्य महोत्सवाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी

गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त