Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेचा शॉर्टकट दुचाकीस्वार तरुणाच्या जीवावर बेतला, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्ता दुभाजकाच्या झाडीमधून रस्ता ओलांडण्यासाठी अचानक महामार्गावर आलेल्या महिलेची धडक दुचाकीस्वाराला बसली. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू (Accidental Death) झाला. हा अपघात मंगळवारी (दि.19) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Old Pune-Mumbai Highway) हॉटेल थंडा मामलाच्या समोर झाला. याप्रकरणी महिलेवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ओंकार सुनील सोनवणे Omkar Sunil Sonwane (वय-20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) गणेश धर्मा आंबवणे Ganesh Dharma Ambavane (वय-37) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी महिलेवर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला हॉटेल थंडा मामला (Hotel Thanda Mamla) समोरील
महामार्गावरुन रस्ता क्रॉस करीत होती. याठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसींग नसताना तसेच दुभाजकाला
रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी अंतर नसताना महिला दुभाजकाच्या झाडांमधून हयगयीने व निष्काळजीपणे अचानक
महामार्गावर आली. त्यावेळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने दुचाकीवरुन (एमएच 14 एचटी 4763) जाणाऱ्या ओंकारच्या
दुचाकीला महिलेची धडक बसली. यामध्ये ओकांर याची गाडी घसरल्याने तो महामार्गावर पडला.
यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू; चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार