Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : आर्थिक व्यवहारातून दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, सख्ख्या भावासह दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | आर्थिक वादातून पुतण्या आणि सख्ख्या भावाने एकाला बेदम मारहाण करून डोक्यात दगड मारुन खून करण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). ही घटना शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास देहूगाव माळवाडी (Dehugaon Malwadi) येथे घडली. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी (Dehu Road Police) दोघांना अटक केली आहे.

याबाबत संभाजी शांताराम बाळसराफ (वय-56 रा. देहुगाव माळवाडी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून बाळकृष्ण शांताराम बाळसराफ, पुतण्या योगेश राजाराम बाळसराफ यांच्यावर आयपीसी 307, 341, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी बाळसराफ हे त्यांच्या शेतात ज्वारी पिकाची राखण करत होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या योगेश त्याठिकाणी आला. त्या दोघांमध्ये कर्जासंदर्भात बोलणे सुरु होते. त्यावेळी संभाजी यांचा भाऊ बाळकृष्ण तिथे आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भांडण सुरु असल्याचे पाहून फिर्यादी यांची पत्नी त्याठिकाणी आली. त्यावेळी योगेशने फिर्यादी याच्या पत्नीला काठीने मारहाण केली.

त्यानंतर संभाजी आणि त्यांच्या पत्नीने घाबरुन शेतातून पळून घरी जाऊ लागले.
आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. संभाजी यांना आडवून योगेशने ‘मी तुला आज संपवुन टाकणार’
असे म्हणत त्यांना काठीने मारहाण केली. तसेच दगड डोक्यात मारून खून करण्याचा प्रयत्न केला.
संभाजी हे जखमी झाल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त