Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बायकोशी बोलत असल्याच्या संशयावरुन लोखंडी पाईपने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | तू माझ्या बायको बरोबर बोलतो काय अशी विचारणा करुन एकाला लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील आळंदी गावच्या हद्दीतील आवारे हॉस्पिटलच्या समोरील रोडवर शुक्रवारी (दि.8) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत सदाशिव इनामदार (वय-40 रा. आळंदी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी माऊली वामनराव पपुले (रा. केळगाव ता. खेड) याच्यावर आयपीसी 341, 326 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार हे आळंदी येथील आवारे हॉस्पिटलच्या समोरील सार्वजनिक रोडवरुन पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी लोखंडी पाईप घेऊन आला. त्याने इनामदार यांना अडवून ‘तू माझ्या बायको बरोबर बोलत आहे काय’ असा जाब विचारला. त्यावर इनामदार यांनी, ‘मी तुला ओळखत नाही. मी कशाला तुमच्या बायकोबरोबर बोलू’ असे म्हणून पुढे चालू लागले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाईपने पाठिमागून दोन्ही पायावर, हातावर बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके करीत आहेत.(Pune Pimpri Chinchwad Crime)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक