Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : शेअर मार्केटमध्ये 350 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 26 लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Cheating Fraud Case | शेअर मार्केटमध्ये 350 टक्के परतावा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 83 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 13 नोव्हेंबर 2023 ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) एका महिलेसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत अमित प्रकाश बर्गे (वय-40 रा. शरदनगर, चिखली, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित शहा व एका महिलेवर आयपीसी 420, 406, 34 सह आयटी अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 350 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना रोआर्क कॅपिटल इंडिया इक्वीटीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतले. त्या माध्यमातून प्रलोभन दाखवून वेळोवेळी शेअर व आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.

फिर्यादी यांनी रोआर्क कॅपिटल इंडिया या अॅपच्या माध्यमातून 15 लाख 83 हजार रुपये जमा केले.
त्यानंतर आरोपींनी जमा केलेल्या रक्कमेचे एक कोटी रुपये झाले आहेत, ते काढण्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपये
भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे जमा केले.
त्यानंतर फिर्यादी यांना आज पर्य़ंत शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रक्कमेवरील नफा तसेच गुंतवलेले पैसे परत न करता
25 लाख 83 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : शुल्क कारणावरुन फळविक्रेत्याला दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू, आळंदी येथील घटना

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | गृहमंत्री फडणवीसांनी केला पलटवार, ”उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, Get Well Soon”