Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुगार खेळण्यासाठी पैसे देण्यास नकार, पत्नीच्या डोक्यात घातला लोखंडी ठोंबा; पतीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | जुगार खेळण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिला. याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी ठोंबा डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) आरोपी पतीला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) रात्री एकच्या सुमारास घडला आहे.

गणेश राम काळकुटे (वय 32, रा. बालघरे वस्ती, चिखली) याच्यावर आयपीसी 307, 326, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती गणेश याने जुगार खेळण्यासाठी पैसे मागितले.
फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी पतीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच लोखंडी ठोंबा फिर्यादीच्या डोक्यात ठिकठिकाणी मारून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांची आई भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही लोखंडी ठोंब्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त