Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी भाई आहे’ तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी स्वयंघोषीत भाई गजाआड

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime | ‘मी इथला भाई आहे, जेल भोगून आलोय’ असे म्हणत तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मार्च रोजी रिव्हर रोड पिंपरी येथे घडली आहे. याप्ररणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) एका स्वयंघोषीत भाईला अटक केली आहे.

सलिम रहिमान शेख (वय-30 रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौतम उर्फ दाद्या दिपक कदम (वय-23 रा. रिव्हर रोड, पिंपरी) याच्यासह पाच ते सहा जणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 249 नुसार गुन्हा दाखल करुन गौतम कदम याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींची विचारपूस केली. याचा राग आल्याने आरोपी गौतम व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. यानंतर शिवीगाळ करुन सिमेंटच्या गट्टूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मी येथील भाई आहे, मी जेल भोगुन आलो आहे, मला तुला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बनावट स्पेअर पार्टची विक्री, दोघांवर FIR

भोसरी : टीव्हीएस कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे-नाशिक हायवे वरील जय गोगा ऑटोमोबाईल व
भोसरी उड्डाणपुलाखालील मनोज अॅटो स्पार्ट या दुकानात केली.
याप्रकरणी जयेश उकमलजी जैन (वय 34, रा. दिघी रोड, भोसरी), मनोज खिमजी पलान (वय 56 रा. भोसरी)
यांच्यावर आयपीसी 420 सह प्रतीलिपी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी 51 हजार 811 रुपयांचे बनावट स्पेअर पार्ट जप्त केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक