Pune Pimpri Chinchwad Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक, भोसरी मधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | एमएसईबी ऑफीसमधून (MSEB Office) बोलत असल्याचे सांगून एका महिलेला अ‍ॅप डाऊनलोड (Download APP) करण्यास सांगितले. त्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यातून अज्ञाताने 1 लाख 75 हजार 570 रुपये ट्रान्सफर (Money Transfer) करुन फसवणूक (Cheating) केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 14 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास भोसरी येथील पांजरपोळ येथे महिलेच्या राहत्या घरात घडला आहे.

याबाबत 46 वर्षाच्या महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 9749722838 आणि 9749722838 या मोबाईल धारकांविरुद्ध आयपीसी 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन एमएसईबी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे लाईटबील (Light Bill) तुम्ही भरले नाही.
त्यामुळे मीटर कट होणार असल्याचे मेसेज पाठवले. तसेच मेसेजद्वारे एक लिंक पाठवून क्विक सपोर्ट
(Quick Support) नावाचे स्क्रिन शेअरिंग अ‍ॅप्लिकेशन (Screen Sharing Application) डाऊनलोड
करण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केले.
यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 75 हजार 570
रुपये परस्पर ऑनलाईन ट्रान्स्फर (Pune Cyber Crime) करुन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime | Pretending to be speaking from MSEB 2 lakhs online fraud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी