Pune Pimpri Chinchwad News | पावसाने शहरात १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना; वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात मंगळवारी सकाळी पावसाची (Pune Rain) हलकी सर आली. रस्त्यावर सांडलेले ऑईल व पाणी यांच्या मिश्रणामुळे दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना शहरात विविध ठिकाणी घडल्या. शहरात १० ठिकाणी अशा घटना घडल्याचे अग्निशामक दलाकडून (Fire Brigade) सांगण्यात आले. त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान जाऊन त्यांनी माती टाकून रस्ता स्वच्छ केला. यात काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. दुदैवाने कोणतीही गंभीर घटना समोर आली नाही. (Pune Pimpri Chinchwad News)

सेनापती बापट रोडवरील बालभारतीसमोर सकाळी अनेक वाहने घसरली. विशेषत: छोट्या स्कुटरेटची चाके लहान
असल्याने त्या घसरण्याचे प्रमाण अधिक होते. तसेच फातिमानगर, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोरील रस्ता,
बिबवेवाडी, राजभवनसमोरील रस्ता, वानवडी, म्हात्रे पुलाजवळ अशा १० ठिकाणी वाहने घसरत असल्याच्या तक्रारी
अग्निशामक दलाकडे आल्या होत्या. दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकाला अटक, येरवडा परिसरातील घटना

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना