Pune Pimpri Crime | कंपनीची फ्रॅन्चायजीच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; दोन संचालकांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | झायलोस इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. लि. कंपनीची फ्रॅन्चायजी देण्याच्या बहाण्याने तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला आहे.

याबाबत संतोष सुरेश काकडे (वय 39, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी झायलोस इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. लि. कंपनीचे संचालक याकुब अली खाजा अहमद व राघवेंद्र रेड्डी नानायाल यांच्यावर आयपीसी 420, 506, 504, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झायलोस इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. लि. कंपनीचे संचालक याकुब अहमद यांनी कंपनीची फ्रॅन्चायजी घेतली तर जास्त फायदा मिळेल असे आमिष फिर्यादी यांना दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून याकुब अहमद यांनी फ्रॅन्चायजीसाठीचे लागणारे ऑफिसचे भाडे, डिपॉझिट, इंटेरिअरचे काम करण्यासाठी आणि कंपनीचे हब विकत घेण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 1 कोटी 7 लाख 44 हजार 600 रुपये घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन कंपनीची फ्रॅन्चायजी दिली नाही.

फिर्यादी यांनी कंपनीचे संचालक याकुब अहमद यांच्याकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून पैसे घेण्यासाठी हैदराबाद येथे आला तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
तसेच तुझे पैसे देणार नाही असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी
सांगवी पोलिसांकडे धाव घेत कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध फिर्य़ाद दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | 1 crore defrauding the company on the pretext of franchise; FIR against two directors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन