Pune Pimpri Crime | कॅनडा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कॅनडा येथील विद्यापीठात (Canada University) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची 13 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत पिंपरी येथील खराळवाडी येथे (Pune Pimpri Crime) घडला आहे.

 

दीपक रामधीरज यादव Deepak Ramdhiraj Yadav (वय – 31 रा. खराळवाडी, मुळ रा. नाशिक) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 15) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनदीप सिंग Mandeep Singh (रा. उत्तराखंड), पकंज अग्रवाल Pakanj Agarwal (रा. कानपूर) यांच्या विरोधात IPC 420, 406, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटी (Algoma University) येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आरोपींना 13 लाख 25 हजार रुपये दिले. मात्र आरोपींनी अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. आरोपींनी पैशांचा अपहार करुन फिर्यादी यांना पैसे परत न देता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (PSI Kokate) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 13 lakh fraud on the pretext of getting admission in Canadian university

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा