Devendra Fadnavis | ‘माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं अन् मी उपमुख्यमंत्री झालो’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Shiv Sangram leader Vinayak Mete) यांचं अभिष्टचिंतन करु इच्छितो. भारतीताई तुम्ही म्हणाल्या, गिफ्ट. तुम्हाला माहित आहे का ? गिफ्ट पेक्षा सरप्राईज गिफ्ट (Surprise Gift) फार महत्त्वाचं असतं. मला मिळालं ना सरप्राईज गिफ्ट. मी विरोधी पक्षनेत्याचा माजी मुख्यमंत्री (CM) बनायला गेलो होतो. तसं पत्रकार परिषदेत घोषितही केलं होतं. पण माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि सांगितले तुम्ही सत्तेत जा आणि मी उपमुख्यमंत्री झालो. म्हणून मी सत्तेत आलो. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. राजकारणात गिफ्ट हे घोषित केलेलं नसतं. ते सरप्राईज गिफ्टचं असतं अन् ते योग्य वेळी मिळणार, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेटे यांना आश्वस्त केले. विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) भाष्य केलं.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार ओबीसींचं आरक्षण परत मिळवेल.
आम्ही खुर्चा तोडण्यासाठी सत्तेत आलो नसून समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात पुन्हा नव्याने शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) सरकार आले आहे.
परंतु हे सरकार शिवसंग्रामसहीत सर्वांना सत्तेत सामावून घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मागे पडू दिलेला नाही.
यापूर्वी आपण जे कष्ट घेतले ते शून्यात मिळवण्याचे काम मागील सरकारने केले आहे.
जे सरकारच्या हातात होते ते सरकारने केले नाही.
आता आपण सत्तेत आहोत, रस्ता कठीण आहे, मात्र हा रस्ताही आपण पार करु असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | surprise gift important in politics says bjp leader devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा