Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी

पुणे / लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला फिरण्यासाठी आलेल्या एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची बस थेट 40 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालकाचे (Pune Pimpri Crime) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील लोहगड येथे पर्य़टनासाठी अनेकजण येत असताता. पेण येथून 80 जण बसमधून फिरण्यासाठी आले होते. त्यात 72 विद्यार्थी, चार शिक्षक आणि इतर कर्मचारी होते. लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत ही बस कोसळली. जखमी असलेल्या तिघांना लोणावळा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर इतर जखमींना लोणावळा व सोमाटणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्र
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यात आले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. अचानक झालेल्या अपघातामुळे विद्यार्थी घाबरले.
यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title :-Pune Pimpri Crime | a bus of students from pen fell into a 40 feet deep gorge pune accident news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kraigg Braithwaite | क्रेग ब्रेथवेटने ऑस्ट्रेलियात केला विक्रम! अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा तिसरा कर्णधार

Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल