Pune Pimpri Crime | महिला पोलिसाला मारहाण करुन विनयभंग, आळंदी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलिसाला (Lady Police) मारहाण करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) रविवारी (दि.20) रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान देहूफाटा चौक, आळंदी येथे घडला आहे. याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.

भुषण मनोज गिते Bhushan Manoj Gite (वय-40 रा. मरकळ रोड, घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे Dattatraya Rama Kokre (वय-26 रा. गोलेगाव ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी वाहतूक शाखेतील (Pimpri Traffic Branch) महिला पोलीस नाईक यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 353, 354, 509, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

आळंदी येथील कार्तिकी यात्रेमुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दिघी-आळंदी , देहू रोड, तळवडे चाकण
येथून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिला आहे. मात्र, वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करुन आरोपी
देहूफाटा चौकातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Shri Sant Dnyaneshwar Maharaj) मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरुन जात होते. त्यावेळी वाहतूक नियमन करणाऱ्या फिर्यादी यांनी आरोपींना आडवले.

आरोपी भूषण जैन याने फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले.
तसेच शिवीगाळ करुन दमदाटी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तर आरोपी कोकरे याने जैन याला मदत केली. फिर्यादी यांच्यासोबत बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोराळे हे मदतीसाठी आले असता जैन याने गोराळे यांना देखील मारहाण केली. आरोपी तेथून पळून जात असताना जमावाने त्यांना मारहाण केली.
जमावाच्या तावडीतून आरोपी पळून जाताना लोखंडी पोलला धडकल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एच. शिखरे (PSI B.H.Shikhare) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A woman lady police officer was beaten and molested, incident in Alandi

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

IND vs NZ 3rd T20 | भारत आणि न्यूझीलंड सामना हॉटस्टारवर नाहीतर ‘या’ अ‍ॅपवर पाहता येणार