Pune Pimpri Crime | देहूगावातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 26 जणांना अटक; 35 लाखाचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | देहूगाव येथे कंपनीच्या ईमारतीमध्ये सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 26 जणांना अटक (Arrest) करुन 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) रात्री दोनच्या सुमारास देहूगाव येथील एच.एच.ई.पी.एल. हेवी इंडस्ट्रियल फैब्रिकेशन लि. देहूगाव (H.E.P.L. Heavy Industrial Fabrication Ltd. Dehugaon) कंपनीच्या इमारतीत (Pune Pimpri Crime) करण्यात आली.

 

दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले (Senior Police Inspector Ramdas Ingwale), पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे (PSI Mangesh Bhange) व पोलीस अंमलदार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी रामदास इंगवले यांना देहूगावतील एच.एच.ई.पी.एल. हेवी इंडस्ट्रियल फैब्रिकेशन लि. कंपनीच्या गेटच्या आतमध्ये असलेल्या इमारतीमध्ये काही जण तीन पत्ती जुगार पैशावर खेळत असल्याची माहिती मिळाली. (Pune Pimpri Crime)

 

पथकाने कंपनीच्या इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून शेखर गुलाब परंदवाड Shekhar Gulab Parandwad (वय-50 रा. माळवाडी, देहूगाव) व इतर 25 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 5 लाख 33 हजार 610 रुपये रोख रक्कम, 1 क्रेटा कार, 1 स्विफ्ट कार, 18 दुचाकी वाहने, 27 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 35 लाख 10 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole ),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanvat)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे,
पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, आशिष बनकर, राजेश कौशल्ये, प्रविण माने, गणेश कोकणे,
गुन्हे शाखा युनिट 5 कडील धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, संदिप ठाकरे, सावन राठोड,
दत्तात्रय बनसोडे, नितीन बहिरट, शामसुंदर गट्टे व दयानंद खेडकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Crime branch raid on gambling den in Dehugaon, 26 people arrested; 35 lakh worth of goods seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील 10 मोठे निर्णय, मविआला धक्क्यावर धक्के

 

Gopichand Padalkar | उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नसून ती शरद पवारांची माणसं, गोपीचंद पडळकरांचा आरोप

 

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय, शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद