Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत (Panvel Municipal Corporation) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणाला पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र (Fake ID) देखील दिले होते. हा प्रकार 3 डिसेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे (Pune Pimpri Crime) येथे घडला.

याप्रकरणी नागेश तानाजी जगताप Nagesh Tanaji Jagtap (वय-32 रा. तळेगाव दाभाडे) याने गुरुवारी (दि.10)
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी संदीप मारुती पांडव Sandeep Maruti Pandav (वय-30 रा. नवी मुंबई), जगन्नाथ बालकृष्ण Jagannath Balakrishna (वय-37 रा. जुईनगर, ठाणे), नितीन महादू वाघ Nitin Mahadu Wagh
(वय-38 रा. उल्वे, नवी मुंबई) यांना अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना पनवेल महापालिकेत भरारी पथकात (Bharari Squad)
नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तसेच नोकरी लावण्यासाठी डिपॉझीट म्हणून फिर्य़ादीकडून पाच लाख रुपये
तसेच फी म्हणून 50 हजार रुपये असे एकूण 5 लाख 50 हजार रुपये घेतले.
आरोपींनी फिर्यादी यांना पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून दिले.
मात्र, प्रत्यक्षात नोकरी न लावता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता दीड लाख रुपये परत करुन उर्वरित चार लाखांची फसवणूक केली.

Web Title :-  Pune Pimpri Crime | five lakhs cheating with  the young man for getting a-job in panvel municipal corporation pimpri chinchwad pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘मी केलेल्या उठावाची दखल जग घेतंय…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टाकली गजानन किर्तीकरांवर मोठी जबाबदारी

Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘भाजपकडे गेलात की प्रकरण बंद, दुसरीकडे गेलात की सुरु…; राठोड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ आणि भाजपला टोला