Pune Pimpri Crime | मुलीच्या नावाने तो करत होता चॅटींग, प्रकार उघडकीस येताच तरुणाच्या डोक्यात मारला पाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पुजा नावाच्या मुलीचा मोबाईल असल्याचे भासवून तो आपल्याच गल्लीतील तरुणाबरोबर 2020 पासून चॅटींग (Chatting) करत होता़ त्यानंतर त्याने त्या मुलीचा भाऊ असल्याची धमकी (Threat) दिली. त्यातून त्याचा भांडाफोड झाल्यानंतर त्याने तरुणाच्या डोक्यात पाईप पाना मारुन जखमी केले. ही घटना वाकड (Wakad) येथील भाऊसाहेब कलाटे कॉलनीत (Pune Pimpri Crime) घडली.

 

याप्रकरणी वाकड येथील 21 वर्षाच्या तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे आई, पत्नी व दोन बहिणीसह रहात आहे. त्यांना 2020 मध्ये त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp) पुजा नावाच्या मुलीचा मेसेज आला. तिने कॉलेजमधील मैत्रीण म्हणून मेसेज करीत होती. त्यानंतर त्याच नंबरवरुन फिर्यादीला एका मुलीचा भाऊ आहे. मी तुला मारीन अशी धमकी (Death Threats) दिली होती. (Pune Pimpri Crime)

त्यानंतर फिर्यादी यांनी बुधवारी आलेल्या फोनवरील व्हॉटसअ‍ॅपचा प्रोफाईल फोटो पाहिला असता
तो त्यांच्या गल्लीत राहणार्‍या एका 17 वर्षाच्या मुलाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तो 2020 साली मुलीच्या नावाने चॅटींग करीत होता, असे फिर्यादीच्या लक्षात आले.
त्यामुळे त्याने त्यावर फोन करुन विचारणा केल्यावर तो अरेरावीची भाषा करु लागला.
तेव्हा फिर्यादी हा या मुलाच्या घरी गेला. तू मला मुलगी म्हणून चॅटिंग का करीत होता, असे विचारले.
तेव्हा त्याने मी नाही केले चॅटिंग. मी आताच मोबाईल घेतलाय, असे म्हणू लागला.
त्यावरून त्यांच्यात बाचा बाची झाली. तेव्हा त्याने तेथे असलेला पाईप पाना फिर्यादीच्या डोक्यात घालून
त्याला जखमी केले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | He was chatting in the name of the girl, hitting the young man in the head as soon as the type was revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; ‘हे’ आहे कारण…

 

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत