Pune Pimpri Crime News | दिवाळीत महिलांचे दागिने चोरणारा चिखली पोलिसांकडून गजाआड, दोन गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | सध्या दिवाळी सणाची धामधूम सर्वत्र सुरु आहे. दिवाळी सणानिमित्त महिला व नागरिक बाजारात कपडे, दागिने इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. याचाच फायदा घेऊन बाजारात दागिने घालुन आलेल्या महिलांवर पाळत ठेवून त्या रोडने जात असताना अचानकपणे येऊन दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला चिखली पोलिसांनी (Pimpri Police) अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

रोहित दशरथ गावडे Rohit Dashrath Gawde (वय-23 सध्या रा. दत्तनगर, जाधववाडी चिखली, मुळ रा. जंक्शन लासुर्णे, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरट्याचे (Chain Snatching) नाव आहे. त्याच्याकडून चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत 24 वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला घरी जात असताना आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले होते. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास जाधववाडी येथे घडली होती. अशीच एक घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली होती. (Pune Pimpri Crime News)

चिखली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले होते. चिखली पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दोन्ही ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता हा गुन्हा 20 ते 25 वर्षाच्या व्यक्तीने केल्याचे समोर आले. त्यानुसार तपासी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी जाधववाडी परिसरातील बाजारात आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सीसीटीव्ही मधील व्यक्ती गुन्हा करण्याच्या तयारीत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील महिलांचे चोरलेले दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doifode),
सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर (ACP Vivek Muglikar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर (Sr PI Dnyaneshwar Katkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद (API Taufiq Syed), पोलीस अंमलदार बाब गर्जे,
सुनिल शिंदे, चेतन सावंत, भास्कर तारळकर, दिपक मोहिते, संदीप मासाळ, अमोल साकोरे,
विश्वास नाणेकर, कबीर पिंजारी, राठोड, संतोष सपकाळ, गौतम सातपुते, नाईक यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणत दोघांना मारहाण, माळवाडी परिसरातील घटना; 4 जणांना अटक

पुणे : अल्पवयीन मुलाकडून 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न