Pune Pimpri Crime News | वर्क फ्रॉम होम देऊन साडे अकरा लाखांची फसवणूक, पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | वर्क फ्रॉम होम (Work From Home) देऊन जास्तीचे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून 11 लाख 51 हजार 984 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत पिंपळे सौदागर येथे फिर्यादी यांच्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी अभिजीत बबनराव उल्हे (वय- 44 रा. पिंपळे सौदगर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 628564661XXXXX क्रमांक धारक आणि Cutshort HQ या कंपनीची एच आर महिले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) विरोधात आयपीसी 420, 406, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांना वर्क फ्रॉम होम देऊन जास्त पैसे कमवण्याचे आमिष दाखवले. प्रथम गुगल वर काही लोकेशनला लाईक करण्याचा टास्क देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही पैसे फिर्य़ादी यांना पाठवले. त्यानंतर त्यांना टेलीग्राम ग्रुपवर BTC/USDT मध्ये जास्त गुंतवणुक (Investment) केल्यास जास्त परतावा मिळत असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांना 11 लाख 51 हजार 984 रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पैसे दिल्यानंतर फिर्य़ादी यांना कोणताही परतावा अथवा पैसे परत न करता फसवणूक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला हातोड्याने मारहाण, निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पत्ता विचारताच कार बाजूला घ्यायला लावून लुटले, पाषाण येथील मध्यरात्रीची घटना

Pune Pimpri Crime News | देहूगावात इंद्रायणी घाटावर दगडाने ठेचून एकाचा निर्घृण खून

किरकोळ कारणावरुन तरुणावर हातोडी व कोयत्याने हल्ला, चार जणांवर FIR; हिंजवडी परिसरातील घटना

शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 62 वी स्थानबध्दतेची कारवाई