Pune Pimpri Crime News | किरकोळ कारणावरुन तरुणावर हातोडी व कोयत्याने हल्ला, चार जणांवर FIR; हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | गाडीचा आरसा लागला म्हणून दुचाकीस्वार तरुणाला एका कुटुंबाने दगड, हातोडी व कोयत्याने मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.21) रात्री पावणे आठ ते साडे आठ दरम्यान कासारसाई येथे घडला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

तुषार अंबर थोरवे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तुषार याचे वडिल अंबर रामचंद्र थोरवे (वय-53 रा. कासारसाई ता. मुळशी) यांनी हिजंवडी पोलीस ठाण्यात (Hijwandi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन लक्ष्मण थोरवे, त्यांची पत्नी व दोन मुलींवर (सर्व रा. कासारसाई) आयपीसी 324, 323, 504, 506, 506 (2), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तुषार हा दुचाकीवरुन घरी येत होता. घराजवळ राहणारा आरोपी लक्ष्मण थोरवे याच्या गाडीला तुषारच्या गाडीचा आरसा अंधारात चुकुन लागला. यावरून लक्ष्मण थोरवे याने तुषार याला पकडले. तर त्याच्या दोन मुलींनी त्याठिकाणी पडलेल्या दगडाने तसेच खिळा ठोकण्याच्या हातोडीने मारहाण केली.
लक्ष्मण थोरवे व त्याच्या पत्नीने कोयत्याने मारहण केली.
तसेच फिर्यादी यांच्या पाठीत हातोडी मारून जखमी केले. तर फिर्यादी यांच्या लहान मुलाच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली.
तसेच फिर्य़ादी व मुलाला कोयत्याने तोडण्याची धमकी दिली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

थकीत दंड कमी करण्याची वाहनचालकांना संधी, पुणे वाहतूक पोलिसांकडून ‘जिल्हा हेल्प डेस्क’ सुरु

शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 62 वी स्थानबध्दतेची कारवाई

कराराप्रमाणे सदनिका न देता गृहरचना संस्थेच्या सभासदांची फसवणूक; 6 जणांवर FIR