Pune Pimpri Crime News | एकाच फ्लॅटची दोन जणांना विक्री, बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल; देहुगाव येथील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | एक फ्लॅट दोन जणांना विकून त्या फ्लॅवर 16 लाख 26 हजार रुपयांचे फायनान्स कंपनीकडून (Finance Company) होम लोन (Home Loan) काढून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिल्डरसह तिघांवर देहुरोड पोलीस ठाण्यात (Pimpri Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2017 ते आजपर्यंत देहुगाव येथील द्वारका स्कीम मध्ये घडला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत अमोल शिवाजी गेडेवाड (वय-38 रा. मु.पो. मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार मध्यस्थी गिरीश व्यंकट नारलावार (वय-26 रा. काशीनाथ पाटील नगर, धनकवडी, पुणे), बिल्डर गिरीश धनराज भटेवारा (रा. पिंपळे गुरव) व अॅस्पायर होम फायनान्स शाखा दापोडी (Aspire Home Finance Branch Dapodi) चे तत्कालीन मॅनेजर राजेंद्र सुरेश शिळीमकर (वय-42 रा. सावता माळी मंदिराजवळ, नऱ्हे) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिरीश याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फ्लॅट देतो असे सांगितले. अमोल याने फिर्यादी यांच्या कागदपत्राचा वापर करुन अॅस्पायर होम फायनान्स मधून 16 लाख 26 हजार 956 रुपयांचे होम लोन घेतले.
हे होम लोन फायनान्स कंपनीचे तत्कालीन मॅनेजर राजेंद्र शिळीवकर यांनी मंजुर केले.
त्यानंतर कर्जाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली.
बांधकाम व्यावसायिक गिरीश भटेवारा यांनी देहूगाव येथील द्वारका स्कीम मधील
फ्लॅट क्रमांक 405 ही गौतम भागुजी डोळस यांना यापूर्वीच विकलेली असताना
त्या फ्लॅटचे पुन्हा फिर्यादी यांच्या नावाने नवे रजिस्ट्रेशन करून पुन्हा विक्री करुन आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ऑनलाइन टास्क देऊन तरुणाला 18 लाखांचा गंडा, पिंपळे गुरव मधील प्रकार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार, घोरपडी गावातील प्रकार

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना