Pune Pimpri Crime News | बहिणीच्या बालविवाहाचा भावानेच केला पर्दाफाश, लग्न लावणाऱ्या भटजीसह 10 जणांवर FIR; पिंपरी चिंचवड मधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | बालविवाह (Child Marriage) लावणे आणि विवाह करणे कायद्याने गुन्हा असताना मुला-मुलींचे लग्न लावून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड येथील थेरगावमध्ये 15 नोव्हेंबर रोजी एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका 23 वर्षाच्या मुलासोबत लावून देण्यात आला. याबाबत दोन्ही कडील कुटुंबाने गुप्तता पाळली होती. मात्र, मुलीच्या 20 वर्षाच्या भावाने याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी लग्नात सामील होणारे अल्पवयीन मुलीचे वडील, मुलाचे आई-वडील, लग्न लावणारा भटजी यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

विजय शंकर जाधव (वय 48, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ), दोन महिला, केशव अच्युत चव्हाण (वय 23, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर), अच्युत चव्हाण, केशव चव्हाण याची बहिण व दाजी, आजोबा, ड्रायव्हर व लग्न लावणारा ब्राह्मण यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 20 वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. बालविवाह 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता पवार नगर, थेरगाव येथे पार पडला. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 12 वर्षाची अल्पवयीन बहिण हिचा विवाह केशव चव्हाण याच्यासोबत लावून दिला. यावेळी सर्व आरोपी लग्नासाठी हजर होते. लग्नाच्या वेळी फिर्य़ादी याच्या वडिलांनी लग्नाबाबत कोणाला सांगू नको असे धमकावले होते. फिर्यादी हे घाबरल्याने काही दिवस याबाबत तक्रार देणे टाळले होते.
नंतर फिर्यादी याने याबाबत आईला सांगितले.
त्यानंतर वडिलांचा विरोध झुगारुन आईसोबत वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळेगाव दाभाडे : बनावट कागदपत्राच्या आधारे वनविभागाच्या जमिनीची विक्री, ठाण्यातील तिघांवर गुन्हा दाखल

सराईत वाहन चोराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, रिक्षा व दुचाकी जप्त