Pune Pimpri Crime | बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ही कारवाई (Pune Pimpri Crime) बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजवर गुरुवारी (दि.1) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली.
प्रकाश मनबहादूर क्षैंत्री (वय 30, रा. बावधन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महेश नारायण वायबसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी प्रकाश याच्यावर आयपीसी 370 (3), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लॉजवर छापा टकून आरोपीला अटक केली.
आरोपी प्रकाश महिलांना जास्तीचे पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होता.
यातून मिळणाऱ्या पैशांतून तो आपली उपजीविका भागवत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | prostitute racket busted at Golden Crown Lodge in Bawdhan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत