Pune Pimpri Crime | पिस्तूलाचा धाक दाखवून भरदिवसा व्यावसायिकाच्या घरात दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला; तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | तळेगाव दाभाडे येथे किराणा दुकानदाराच्या (Grocer) घरात घुसून पिस्तूल (Pistol) आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा (Robbery) टाकला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी दुकानदाराच्या घरातून तीन ते साडेतीन लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने (Gold and Silver Jewellery) असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना (Pune Pimpri Crime) मंगळवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

 

याप्रकरणी दिलीप चंपालाल मुथा Dilip Champalal Mutha (वय-55 रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुथा यांचे वडगाव मावळ येथे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या पत्नीसह मंगळवारी वडगाव येथे त्यांच्या किराणा दुकानात गेले होते. दुपारी जेवण करण्यासाठी ते दोघे तळेगाव येथील घरी आले होते. दुपारी दोनच्या सुमारास चार ते पाच अनोळखी व्यक्ती मुथा यांच्या घरात घुसले. (Pune Pimpri Crime)

 

चोरट्यांनी तोंडावर मास्क लावला होता. त्यांनी मुथा आणि त्यांच्या कुटुंबाला पिस्टल आणि चाकूचा धाक दाखविला.
दरोडेखोरांनी घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखाचा ऐवज चोरून नेला.
त्यानंतर दरोडेखोर दुचाकीवरुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Robbery at a businessman’s house in broad daylight at gunpoint, robbed of ten and a half lakhs; Incident at Talegaon Dabhade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महिला सरपंचासह लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

The Kashmir Files | ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाइल्स’ची निवड; दिगदर्शक विवेक अग्निहोत्रीनी ट्विट करत दिली माहिती

Priya Bapat | अभिनेत्री प्रिया बापटच्या ट्रेडिशनल लूकने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच सुंदर आणि सोज्वळ