Pune Pimpri Crime | लुटायला आले अन् चोरटे स्वत:ची गाडी सोडून पळाले…, पिंपरीतील घटना; नेमकं काय घडलं?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लुटण्याच्या उद्देशाने चार जणांनी तरुणांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तरुणाची दुचाकी अडवून एकाच्या डोळ्यात मिरची पूड (Chili Powder) टाकून दुसऱ्याला चाकूचा धाक दाखवून पैसे आणि दुचाकी घेऊन निघाले. तेवढ्यात तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांनी (Thieves) तरुणांची दुचाकी सोडलीच शिवाय त्यांची दुचाकीदेखील सोडून पळून गेले. ही थरारक (Pune Pimpri Crime) घटना शनिवारी (दि.10) सायंकाळी सातच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथील सुखवानी क्लासिक बिल्डिंगजवळ (Sukhwani Classic Building) घडली.

 

याबाबत जानी आकाशकुमार विष्णुप्रसाद Jani Akshay Kumar Vishnu Prasad (वय 30, रा. व्हिस्डम पार्क, मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन दुचाकीवरील चार जणांविरुद्ध आयपीसी 393, 34, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र पृथ्वीराज राठोड (Prithviraj Rathod) हे दिवसभर श्री बालाजी टायर दुकानात जमा झालेले दीड लाख रुपये अॅक्टिव्हा गाडीच्या डिक्कीत ठेऊन घरी जात होते.
सुखवानी बिल्डिंग येथे आले असता पाठीमागून आलेल्या दोन दुचाकींवरील चार जणांनी त्यांना आडवले.
चोरट्याने फिर्य़ादी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हातावर उलटा कोयता मारला,
तर फिर्यादी यांचा मित्र पृथ्वीराज राठोड याच्या उजव्या हातावर उलटा कोयता मारला.
त्याला कोयत्याचा धाक दाखवून गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले.

दोन चोरटे गाडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना फिर्यादी यांनी जवळच कन्स्ट्रक्शनच्या कामावरील फावडे घेऊन चोरट्यांना मारण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले.
त्यावेळी चोरटे फिर्यादी यांचा रुद्र अवतार पाहून फिर्यादी यांची दुचाकी आणि स्वत:ची दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेले,
तर दुसरे दोन जण दुसऱ्या दुचाकीवरून पळून गेले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | They came to rob and the thieves left their car and ran away…, incident in Pimpri; What exactly happened?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार