Pune PMC Employee – 7th Pay Commission | पीएमपी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नववर्षाच्या सुरूवातीपासूनच 7 वा वेतन आयोग लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Employee – 7th Pay Commission | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाची 50 टक्के रक्कम डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या वेतनात दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त बैठक घेऊन पुढील रक्कम कशी देयची यावर निर्णय घेणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod alias Nana Bhangire) यांनी दिली. (Pune PMC Employee – 7th Pay Commission)

पीएमपीच्या सातवा वेतन आयोग व कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नाबाबत नाना भानगिरे यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (IAS Om Prakash Bakoria) यांची भेट घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यावेळी बकोरिया यांनी महापालिकेच्या धर्तीवर पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची 50 टक्के रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचा फायदा 10 हजार पीएमपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत सोमवारी बैठक झाली. त्यानुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन आयोगाची 50 टक्के रक्कम जानेवारीच्या वेतनात दिली जाणार आहे. उर्वरीत फरकाची रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली असून ते सोडवण्यात येतील, असे पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने पीएमपी कामगार संघटना (इंटक), पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार
युनियन, पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचारी महासंघ, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड,
पुणे महानगर परिवहन महामंडळ निवृत्त सेवक संघ यासह विविध संघटनांनी कामगारांचे प्रश्न उपस्थित केले.

Web Title :- Pune PMC Employee – 7th Pay Commission | 7th-pay commission will come into effect from the beginning of the new year for pune pmc employees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट ‘टर्री’चा पोस्ट आउट; लिलतच्या रांगड्या लुकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Maharashtra Revenue Department | पुण्यासह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यामध्ये बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार ! दोषी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील