Pune PMC – IAS Vikram Kumar | ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS)-2023’ अंतर्गत पुणे महापालिकेकडून मेगा ड्राईव्हचे आयोजन

नागरिक, संस्था आणि मंडळांने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC – IAS Vikram Kumar | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरिकांनी एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS)-2023’ अंतर्गत सकाळी 10 ते 11 या वेळेत मेगा ड्राईव्हचे आयोजन केले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी दिली आहे. यावेळी घनकचरा व्यवस्थापनचे उप आयुक्त संदीप कदम (Sandeep Kadam PMC) उपस्थित होते. (Pune PMC – IAS Vikram Kumar)

‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS)-2023’ अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, NYKS, RWAs, कॉर्पोरेट कंपन्या, नागरिक इत्यांना सहभागी करुन 1 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आणि नगारिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, प्लॉगेथॉन ड्राईव्ह इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील भिडे पूल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले. (Pune PMC – IAS Vikram Kumar)

पालिकेकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, सभासद, पदाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालये, खासगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर व प्रतिष्ठिक व्यक्ती, क्षेत्रिय कार्यालयांकडील ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर सहभागी होणार आहेत, असेही डॉ. खेमनार यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय निहाय उपक्रम घेण्यात येणारी ठिकाणे पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर
https://https://swachhatahiseva.com/ यावर उपलब्द करुन दिली आहे. याशिवाय नागरिकांना आपल्या
सोयीनुसार ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवायची असेल तर ते स्वच्छता मोहीम राबवू शकतात.
याबाब https://https://swachhatahiseva.com/ या संकेतस्थळावर माहिती अपलोड करु शकतात.
या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार