Pune PMC- Mahavitaran News | महापालिकेचा राज्य विद्युत मंडळाला अखेर ‘शॉक’; वीज वाहीन्यांसाठीचे खोदाई शुल्क वाढविण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC- Mahavitaran News | वर्षानुवर्षे महापालिकेला सर्वसामान्यांप्रमाणे घरगुती आणि व्यावसायीक दराने वीज पुरवठा करणार्‍या राज्य विद्युत मंडळाला पुणे महापालिकेने अखेर ‘शॉक’ देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी सवलतीच्या दरात खोदाईची रक्कम आकारणार्‍या महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) यापुढे खाजगी कंपन्यांच्या पन्नास टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आतापर्यंत सवलतीच्या दरात २ हजार ३५० रुपये दरावरून प्रतिमीटरसाठी ६ हजार ९६ रुपये आकारण्यात येणार आहे. (Pune PMC- Mahavitaran News)

यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभागाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. विशेष असे की, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतेच झालेल्या बैठकीमध्ये महापालिका आणि विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये भुईभाड्याचा प्रश्‍न चर्चेला आल्यानंतर पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांच्या सूचनेनुसारच पथ विभागाने खाजगी कंपन्यांच्या तुलनेत विद्युत मंडळाच्या उपकंपन्यांकडून भुईभाडे पन्नास टक्क्यांप्रमाणे आकारण्याचा प्रस्ताव मांडल्याने त्याला मंजुरी मिळून अंमलबजावणीही होणार आहे. (Pune PMC- Mahavitaran News)

शहरात मोबाईल कंपन्या, एमजीएनएल, विद्युत कंपन्या यांना भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये प्रति मिटर खोदाई शुल्क निश्‍चित केले आहे. या शुल्कातून रस्ते दुरुस्तीचा खर्च वसूल केला जातो. खासगी कंपन्यांसाठी प्रति मिटर १२ हजार १९२ रुपये दर आहे. तर विद्युत मंडळासाठी २ हजार ३५० रुपये, एचडीडी तंत्रज्ञानाने खोदाईसाठी प्रति मीटर चार हजार रुपये, पीट्स सह खोदाईसाठी प्रतिमीटर ६ हजार १६० रुपये शुल्क आकारले जाते. एमजीएनएल, बीएसएनएल अशा कंपन्यांना ५० टक्के सवलत देऊन ६ हजार ९६ रुपये शुल्क घेतले जाते.

राज्य विद्युत मंडळाकडून आतापर्यंत महापालिकेची लूटच!

पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. महापालिकेची कार्यालये, शाळा, रुग्णालये तसेच विविध वास्तूंसोबतच रस्त्यांवरील पथदिवे, जलकेंद्र, एसटीपी प्लांटस्, कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी वीज अत्यावश्यक आहे. महावितरण वीज वापरानुसार सर्वसामान्य प्रचलित दरानुसारच घरगुती आणि व्यावसायीक दराने वीज पुरवठा करते. यासाठी दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपये बील भरत असते. मात्र, महापालिका खाजगी केबल कंपन्यांच्या तुलनेत विद्युत मंडळाकडून एक एक पंचमाश पेक्षाही कमी दर आकारत आली आहे.

तसेच पदपथावरील विद्युत मंडळाचे पोल्स, डी.पी. हटविण्यासाठी येणारा खर्च
देखिल नागरिकांची गरज आणि वेळ लक्षात घेउन महापालिकाच करते.
शहरात मागील काही वर्षामध्ये झालेल्या रस्ता रुंदीकरणातील बहुतांश वीजेचे खांब आणि डी.पी.
महापालिकेने स्वखर्चानेच हलविले आहेत.
यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC On Dengue Outbreak | डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’
संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया