Pune PMC On Dengue Outbreak | डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया

नागरिकांच्या पैशांची ‘फवारणी’ कोणासाठी? पालिकेत दबक्या आवाजात चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC On Dengue Outbreak | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य विभागाचा (PMC Health Department) नवीनच प्रताप समोर आला आहे. ऐन पावसाळ्यात (पारेषण काळ) ‘डेंग्यू’ची साथ असताना इनडोअर औषध फवारणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज असताना तो कालावधी संपल्यानंतर दोन कोटी रुपयांची निविदा (PMC Tender) प्रक्रिया राबविली आहे. ही निविदा प्रक्रिया नेमकी ‘कोणासाठी’ असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. (Pune PMC On Dengue Outbreak)

महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागाच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात येते. विशेषत: जून ते नोव्हेंबर दरम्यानच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये डासांमुळे होणार्‍या डेंग्यू व अन्य संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असताना आरोग्य विभाग अधिकच सतर्क होतो. यावेळी सार्वजनिक ठिकाणांसोबतच डासांची उत्पत्तीची स्थळे असलेल्या घरांमध्ये, ज्या ठिकाणी डेंग्यूचा रुग्ण आढळतो, त्याचा वावर असलेल्या अजूबाजूच्या परिसरात विशेषत: घरांमध्ये, टेरेस व मोकळ्या जागांवर जावून औषध फवारणी करून उत्पत्ती स्थळे नष्ट केली जातात. (Pune PMC On Dengue Outbreak)

महापालिकेचे क्षेत्रफळ हे मोठे असून या विभागाकडील मनुष्यबळ कमी आहे. यासाठी महापालिका दरवर्षी जून ते नोव्हेंबर या पारेषण काळात कंत्राटीपद्धतीने मनुष्यबळ घेते. विशेष असे की, फवारणी करण्यात येणारी औषधे ही मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरणारी असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळ घेण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असतो. परंतू मागील दोन वर्षांपासून या कामासाठीची निविदा प्रक्रिया सातत्याने वादात सापडली आहे. त्यामुळे यंदातरी पुणेकरांच्या आरोग्याचा विचार होउन प्रशासन सतर्कता बाळगेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, यावर्षीही निविदा प्रक्रिया वादात अडकून तिला विलंब झाला आहे. त्यामुळे पावसाळा संपला तरी यावर्षीची निविदा अद्याप उघडलेलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसरीकडे यंदा शहरात पुरेशा प्रमाणात पाउस झालेला नाही. त्यामुळे डेंग्यूची रुग्णसंख्यादेखिल दरवर्षीच्या तुलनेत कमी राहीली. ही परिस्थिती असतानाही आरोग्य विभागाने निविदा मागविल्या व त्यांची छाननी सुरू ठेवली आहे. लवकरच ही निविदा उघडून मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर ‘निविदा’ रद्द करू

मागील दोन वर्षे निविदा प्रक्रियेवर आक्षेप आल्याने विलंब झाला.
ठराविकच ठेकेदारांना हे काम मिळेल अशा अटी शर्ती निविदेमध्ये असतात,
असा हा आक्षेप होता. यामुळे यंदाही मे महिन्यांत पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा रद्द करण्यात आली.
या अटीमध्ये बदल करून जूनमध्ये फेरनिविदा काढण्यात आली.
यामध्ये ९ ठेकेदार सहभागी झाले आहेत. त्यांच्या स्क्रूटीनीचे काम सुरू आहे.
यंदाचा पारेषण काळ संपत आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्याचाही निर्णय घेता येणार आहे.

  • डॉ. सुर्यकांत देवकर, सह आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका (Dr Suryakant Deokar)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार

Pune PMC News – Nutritious School Food | बालवाड्यांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांचे 6 महिन्यांचे पैसे पुणे महापालिकेने थकविले