Pune PMC News | नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या 80 टक्के पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले

थकबाकीदारांचे परवाने निलंबीत करण्याचा महापालिकेचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेने पुर्नवसन केलेल्या तब्बल ८० टक्के पथारी व्यावसायीकांनी २०१८ पासून महापालिकेचे ५६ कोटी १७ लाख रुपये भाडे थकविले आहे. ही थकबाकी न भरल्यास महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही तसेच परवाने देखिल रद्द करण्यात येतील, असा इशारा अतिक्रमण विभागाने दिला आहे.(Pune PMC News)

महापालिकेने १२ हजार ११३ नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे. या व्यावसायीकांकडून झोननिहाय भाडे आकारण्यात येते. यापैकी तब्बल ९ हजार ८५२ व्यावसायीकांनी २०१८ पासून महापालिकेला भाडेच दिलेले नाही. मूळ भाडे आणि थकबाकीवरील दंडाची आकारणी असे तब्बल ५६ कोटी १७ लाख रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे थकलेली आहे. ही रक्कम भरली नाही तर परवाना नूतनीकरण केले जाणार नाही, प्रसंगी परवाने देखिल रद्द करण्याचा इशारा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिला आहे.

पथारी व्यावसायीक धोरणानुसार महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये नो हॉकर्स झोन तसेच काही महत्वाच्या रस्त्यांवरील नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे.
नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांकडून व्यावसायीक झोननुसार भाडे आकारणी करण्यात येते.
भाडे न भरल्यास दंडही आकारण्यात येतो.
दरम्यान, २०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे संपुर्ण पथारी व्यवसायीक अडचणीत आले.
लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद राहील्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले.
साधारण २०२१ च्या उत्तरार्धात व्यवसाय सुरू झाले.
कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेनेही वसुलीसाठी तगादा लावला नाही.
तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. परंतू यानंतरही अनेकांनी थकबाकी भरली नाही, असे महापालिकेचे अधिकारी सांगतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया