Pune PMC News | हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर पुणे पालिकेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिल टॉप हिल स्लोप (Hill Top Hill Slope) येथील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) बांधकाम नियंत्रण विभागाने अखेर बुधवारी (दि.7) कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळ, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने 29 अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिर ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Pune PMC News)

महापालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली.

ही कारवाई शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
तसेच यावेळी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक,
वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बंडगार्डन, हडपसर परिसरातील अपघातात दोन जणांचा मृत्यू

किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण; येरवडा परिसरातील घटना

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली