Pune PMC News | बोपोडीतील वळसे पाटील आय हेल्थ केअरमध्ये रेटीनावरील शस्त्रक्रिया देखिल शासकिय दरात होणार

शस्त्रक्रियेसाठी महापालिकेकडून अधुनिक उपकरणांची खरेदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | बोपोडी येथील वळसे पाटील रुग्णालयातील आय हेल्थ केअर या विभागासाठी (Vision Next Foundation Dattatray Walse Patil Eye Care Charitable Hospital in Bopodi Pune) रेटीनावरील उपचारासाठी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) दोन अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. सध्या कुठल्यास शासकिय अथवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये डोळ्यांच्या रेटीनावरील उपचाराची सुविधा उपलब्ध नसून ही उपकरणे खरेदी केल्यानंतर सर्वसामान्यांना शासकिय दरात उपचार मिळणार आहेत, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी केला आहे. (Pune PMC News)

महापालिकेने वळसे पाटील रुग्णालयामध्ये पीपीपी तत्वावर डोळ्यांचे हॉस्पीटल उभारले आहे. मागील काही वर्षांपासून हे हॉस्पीटल सुरू असून सर्वसामान्यांसह महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर देखिल येथे उपचार होत आहेत. डोळ्यांच्या उपचारासाठी नवनवीन उपकरणे उपलब्ध होत आहेत. त्यानुसार हा विभाग अधिक अद्ययावत करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. डोळ्यांच्या रेटीनाच्या आजारामुळे अनेकांना अंधत्व येते. परंतू त्यावर उपचार करण्याची सुविधा कुठल्याच शासकिय अथवा निमशासकिय रुग्णालयांमध्ये नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रेटीनावरील उपचारासाठीचा खर्च हा लाखांच्या घरामध्ये जातो. तो सर्वसामान्यांना परवडत नाही. (Pune PMC News)

या पार्श्‍वभूमीवर या हॉस्पीटलमध्ये रेटीना वरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी ओसीटी अँजीओग्राफी आणि यलो लेझर विथ ऍक्सेसरीज ही उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. अंदाज पत्रकामध्ये या हॉस्पीटलसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया राबविली असून ही निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे.

 

दरम्यान, महापालिकेने पीपीपी तत्वावर हॉस्पीटल चालविण्यासाठी दिले असताना तेथील उपकरणे व अन्य खर्च हा हॉस्पीटल चालविणार्‍या संस्थेने करणे गरजेचे आहे. संबधित संस्थेसोबत महापालिकेने तसा करारही केला आहे. ही दोन्ही उपकरणे खरेदीची जबाबदारी संबधित संस्थेची असताना महापालिका सातत्याने उपकरणे खरेदीच्या नावाने अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करत आहे. पीपीपी तत्वावर हॉस्पीटल व अन्य सुविधा देणार्‍यांसाठी व त्यातून नफा कमवणार्‍या संस्थांसाठी महापालिका पायघड्या घालत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.

 

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले कुठल्याच शासकिय अथवा निमशासकिय रुग्णालयांमध्ये डोळ्यांच्या रेटीनावरील शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियांचा खर्च लाखांमध्ये आहे. तो सर्वसामान्यांना परवडत नाही. तंत्रज्ञान प्रगत होत असताना नागरिकांना ही सुविधा निर्माण करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

त्यानुसार आय हेल्थ केअरसोबतच्या करारामध्ये सुधारणा करूनच ही
उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपकरणांमुळे रेटीनामुळे अंधत्व येण्याची शक्यता
असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांवर शासकिय दरामध्ये येथे उपचार होण्यास मदत होणार आहे.
या रुग्णालयामध्ये डोळ्यांच्या सर्व आजारावरील उपचार होणार असल्याने पुढील काळात
विविध योजनांअंतर्गत अन्य रुग्णालयात उपचार घेउन महापालिकेकडून परतावा देणे बंद करण्याचा प्रशासन विचार करत आहे,
असेही बिनवडे यांनी नमूद केले.

 

Web Title : Pune PMC News | At Vision Next Foundation Dattatray Walse Patil Eye Care Charitable Hospital in Bopodi
, retina surgery will also be done at government rates


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा