Pune PMC News | क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा व्यवसायांवर लक्ष ठेवावे; अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | नव्याने उभे राहाणारे बेकायदा स्टॉल, हातगाड्या आणि पथारी व्यावसायीकांची माहिती घेउन ते तत्काळ निर्मुलन करण्यासाठी क्षेत्रिय अधिकार्‍यांनीही स्वत: जातीने लक्ष द्यावे, अशी सूचना अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना केली आहे. (Pune PMC News)

 

नुकतेच जगताप यांनी महापालिकेच्या १५ क्षेत्रिय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. यामध्ये बेकायदेशीररित्या सुरू होणार्‍या व्यवसायांवर क्षेत्रिय कार्यालय स्तरावरच निर्बंध आले तर अतिक्रमणे वाढणार नाहीत.

 

सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीमध्ये नियमितपणे फेरफटका मारून रस्ते अतिक्रमण मुक्त राहातील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पूर्वीपासून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायीक व नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांचा ‘इंटेलिजन्स’ सहाय्यक आयुक्तांनी ठेवावा. कारवाईच्यावेळी अतिक्रमण विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासनही जगताप यांनी या बैठकीमध्ये दिले.

 

Web Title :- Field officials should monitor illegal businesses in their area; Encroachment department head Madhav Jagtap’s suggestion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा