Pune PMC News | आनंदननगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाची माहिती घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Pune PMC News | Information about slum rehabilitation in Anandananagar will be taken - Municipal Commissioner Vikram Kuma
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk, Bibvewadi) आनंदनगर (Anand Nagar, Pune) येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन कोणी केले याची माहिती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. गंगाधाम चौकातील आनंदनगर झोपडपट्टीतील काही कुटुंबियांचे हिलटॉप हिलस्लोपवर अनधिकृत इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यावरून स्थानीक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये मागील आठवड्यात वाद झाले होते. (Pune PMC News)

 

बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकालगत ‘सॉलीटेअर’ या बांधकाम कंपनीच्यावतीने शेकडो सदनिका असलेल्या गगनचुंबी इमारती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीसमोरच मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे ४० वर्षे जुनी झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. विशेष असे की नवीन गृहसंकल्प आणि त्यामागे काम सुरू असलेल्या मोठ्या होलसेल मार्केटकडे जाण्यासाठी या झोपडपट्टीतूनच महापालिकेने कलम २०५ नुसार रस्ता आखला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ८० झोपड्या हलविण्यात येणार आहेत. (Pune PMC News)

दरम्यान, येथील ८० झोपडपट्टी वासियांपैकी पुनर्वसन बिबवेवाडी येथेच हिलटॉप हिलस्लोपवरील दोन इमारतींमध्ये करण्यात आले आहे. या दोन्ही इमारती बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याने काही नागरिकांनी विरोध केला आहे. याला मागील आठवड्यामध्ये वेगळे वळण लागले.
पुनर्वसनाला विरोध केल्याने भाजपच्या स्थानीक लोकप्रतिनिधींनी आम्हाला शिवीगाळ
आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रारही केली आहे.
परंतू अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही.
यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता,
पुनर्वसनावरून वाद झाल्याची बाब आजच समजली आहे.
याप्रकरणी माहिती घेउन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 

Web Title :- Pune PMC News | Information about slum rehabilitation in Anandananagar will be taken – Municipal Commissioner Vikram Kuma

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर