Food Plaza On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीवरील ‘फूड प्लाझा’चा सुधारीत विकास आराखडा

8 कोटी रुपयांच्या कामांची लवकरच निविदा काढणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Food Plaza On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीवर ‘फूड प्लाझा’ उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुधारीत विकास आराखडा (Revised Development Plan For Sarasbaug Chowpatty) तयार केला आहे. यासाठी ८ कोटी रुपये खर्च असून लवकरच या कामाची निविदा (Tender For Food Plaza On Sarasbaug Chowpatty) काढण्यात येणार आहे. (Food Plaza On Sarasbaug Chowpatty)

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक तळयातील गणपती अर्थात सारसबागेचे रुप मागील काही दशकांत टप्प्याटप्प्याने पालटले आहे. येथील चौपाटीवरील ‘खाउ गल्ली’ मध्ये महापालिकेने परवाना दिलेले स्टॉल्स आहेत. या स्टॉलधारकांकडून पुढील भागात सातत्याने अतिक्रमण शेडस् उभारण्यात येतात, व प्रशासनाकडून त्यावर कारवाई करण्यात येते. दीड वर्षांपुर्वी अशीच कारवाई झाल्यानंतर येथील पर्यटक व व्यावसायीकांच्या गरजा लक्षात घेउन प्रशासनाने येथील चौपाटीचा चांगल्याप्रकारे विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विकास आराखडाही तयार करण्यात आला. परंतू त्यामध्ये त्रुटी राहील्याने त्यावर पुढे कार्यवाही होउ शकली नाही. यामुळे प्रशासनाने पुन्हा सुधारीत आराखडा तयार केला आहे. (Food Plaza On Sarasbaug Chowpatty)

यासंदर्भात बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी सांगितले, की सारसबाग चौपाटीवर ‘फूड प्लाझा’ करण्यात येणार आहे. सारसबागेची सीमाभिंत आणि सणस ग्राउंडच्या सीमाभिंती दरम्यान खाउ गल्ली, नागरीकांना बसण्यासाठी आवश्यक रचना, सुशोभीकरण, विविध कलाकृती सादर करण्यासाठीचे छोटेखानी मंच करण्याचे नियोजन आहे. सध्या चौपाटीसमोरील रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. फूड प्लाझा करताना येथील रस्ता बंद करण्यात येणार आहे. या कामासाठी ८ कोटी रुपये खर्च असून लवकरच निविदा काढण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांमधील ड्रेनेजलाईनसाठी बँकांकडून 550 कोटी रुपये कर्ज उचलणार

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आल्यानंतर पुन्हा शिवनेरी पथावर अतिक्रमणाला सुरुवात !

Manoj Jarange Patil | त्यांना राज्यात अशांतता पसरवायची असेल, पण…, भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जरांगेंची प्रतिक्रिया