Pune PMC News | मिळकत कर भरा, अन्यथा गुरुवार पासून जप्तीची कारवाई; पुणे मनपाचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune PMC News) कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ता कर (Property Tax) वसुलीसाठी गुरुवार (दि.22) पासून मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शहरातील ज्या मिळकत धारकांनी अद्यापही मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकीदरावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांना मिळकत कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवली जाणार आहेत. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune News)

पुणे महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पुणे मनपा कार्यक्षेत्रातील ज्या मिळकतधारकांनी अद्याप मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची मोहीम गुरुवार पासून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुणे महानगरापलिकेच्या कर्यक्षेत्रात परिमंडळ निहाय पथके तयार केली आहेत.(Pune PMC News)

नागरिकांना मिळकत कर भरणे सुलभ व्हावे यासाठीस सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवली जाणार आहेत. नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावरुन मिळकत कर भरावा, असे आवाहन पुणे मनपाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना