Pune PMC News | कात्रज-कोंढवा ते टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणारा रस्ता; 24 मीटर ऐवजी 10 मीटर रुंदीचाच होणार; भूसंपादनातील अडचणींमुळे महापालिकेचा निर्णय

पुणे – Pune PMC News | कात्रज – कोंढवा रस्त्याने (Katraj Kondhwa Road) टिळेकरनगर (Tilekar Nagar) मार्गे येवलेवाडी (Yewalewadi) येथील पानसरे नगरकडे जाणारा रस्ता चोवीस एैवजी दहा मीटर रुंदीचाच केला जाणार आहे. विकास आराखड्यात या रस्त्याची लांबी तीन किमी असुन, त्याची रुंदी २४ मीटर इतकी दर्शविण्यात आली आहे. जागा ताब्यात नसल्याने चोवीस एैवजी दहा मीटर रुंदीचाच रस्ता केला जाणार आहे. (Pune PMC News)

 

शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहीती पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी (V. G. Kulkarni) यांनी दिली. या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कात्रज- कोंढवा रस्त्याचा अनुभव पाहाता भूसंपादन झाल्याशिवाय या रस्त्याच्या कामासाठी यापुढील काळात निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य तो विचार करण्यात येईल, अशी भुमिका नुकतीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली होती. येवलेवाडीच्या विकास आराखड्यामध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीतील पानसरेनगरकडे जाणारा सुमारे तीन कि.मी.चा २४ मीटर रुंदीचा रस्ता आखण्यात आला आहे. विशेष असे की हा विकास आराखडा भाजपच्या महापालिकेच्या सत्ताकाळामध्ये करण्यात आला आहे. महापालिकेने विकास आराखडा मंजूर केला असला तरी शासनाने अद्याप त्याला अंतिम मान्यता दिलेली नाही. २४ मी. रुंदीच्या या रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Pune PMC News)

 

या रस्त्याच्या कामासाठी मोठ्याप्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. परंतू संपुर्ण रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्यापुर्वीच मधल्या पट्टयातील सुमारे ३७० मीटर आणि २४ मीटर रुंद रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी १२० मीटर रस्त्याचे कामही जवळपास पुर्ण करण्यात आले आहे. नियोजीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या बांधकाम साईटसचे नियोजन आहे. तर काही ठिकाणी इमारतींची कामेही पूर्ण झाली आहेत. बांधकाम व्यावसायीक परवानगी घेताना एफएसआय अथवा टीडीआरच्या बदल्यात जागा सोडतील. मात्र काही नागरिकांचे छोट्या आकाराचे प्लॉटस देखिल येथे असून काहीठिकाणी शेतजमीन आहे. रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नाही, त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला सुमारे दहा मीटरचा रस्ताच विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच या रस्त्याची पाहाणी केली आहे.
यानंतर काही ठिकाणी मोकळी जागा असून भूसंपादनही शक्य आहे.
तर काही ठिकाणी भूसंपादनामध्ये अडचणी असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्‍वभूमीवर कन्सल्टंट नेमून ताब्यात येणार्‍या जागेचे मोजमाप करून तेवढ्याच जागेवर शक्य आहे
तेवढ्याच आकाराचा रस्ता करावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त.

 

Web Title :- Pune PMC News | Road from Katraj-Kondhwa to Yevlewadi via Tilekarnagar;
10 meters wide instead of 24 meters; Municipal Corporation’s decision due to difficulties in land acquisition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा